banner

अनाहत कलानिकेतन

अनाहत कलानिकेतन हे एक शास्त्रीय संगीत व भारतीय नृत्यकलेचे प्रशिक्षण केंद्र असून, संगीताच्या माध्यमातून संस्कार, सौंदर्यदृष्टी व संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या हेतूने हे कार्यरत आहे.

भारतीय संगीत व नृत्य यामधून संस्कार व सृजनशीलता
  • गायन: शास्त्रीय व सुगम संगीताचे प्रशिक्षण व अभिव्यक्ती विकास
  • वादन: तबला, संवादिनी, बासरी, सिंथेसायझर यांसारख्या वाद्यांचे तांत्रिक व भावनिक प्रशिक्षण
  • नृत्य: भरतनाट्यम व कथक नृत्यशैलींच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक समृद्धी
  • विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज व सादरीकरणाची संधी
  • अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण

उद्देश:

  • भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्यकलेचा प्रसार करणे
  • गुणवत्तापूर्ण कलाशिक्षणाद्वारे कलेचे उपासक घडवणे
  • विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, मानसिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा विकास करणे
  • अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरज यांच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा व प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करून देणे
  • विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी स्टेज व व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सादरीकरणाचा आत्मविश्वास निर्माण करणे

गायन विभाग

गायन विभाग

शास्त्रीय गायन

भारतीय रागसंगीतावर आधारित सखोल प्रशिक्षण उद्देश:
  • राग, आलाप, तान, बंदिश यांची शिस्तबद्ध सादरीकरण शिका
  • पारंपरिक घराण्यांच्या गायनशैलीची ओळख
  • गांधर्व परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन
सुगम संगीत

सुगम संगीत

भावगीते, भक्तिगीते, लावण्या, देशभक्ती गीत यांचा समावेश उद्देश:
  • विद्यार्थ्यांमध्ये गाण्याची अभिव्यक्ती कौशल्य वाढवणे
  • सुगम संगीताच्या माध्यमातून भावनिक समृद्धी करणे
  • स्टेज सादरीकरणासाठी आवश्यक आत्मविश्वास व प्रस्तुती कौशल्य विकसित करणे

वादन विभाग

तबला

तबला

पारंपरिक तालवाद्य शिक्षण उद्देश:
  • ताल, लय, कायदे, परण, तिहाई यांची ओळख
  • सोलो आणि साथसंगती वादन कौशल्य
  • प्रात्यक्षिक व सैद्धांतिक तयारी
हार्मोनियम

संवादिनी (हार्मोनियम)

सूर आणि रागांची साथसंगती उद्देश:
  • सूर सादरीकरणाची तयारी
  • गायनासाठी आवश्यक कॉर्ड्स व स्केलची समज
  • गांधर्व परीक्षेसाठी तयारी
बासरी

बासरी

उद्देश:
  • श्वासाचे नियंत्रण व सूर शुद्धता
  • शास्त्रीय व सुगम वादन
  • सांगीतिक अभिव्यक्तीसाठी बासरीचा प्रभावी वापर
सिंथेसायझर

सिंथेसायझर

उद्देश:
  • आधुनिक संगीताचे डिजिटल वाद्य
  • स्केल, कॉर्ड्स व पाश्चात्य संगीतशैलींची ओळख
  • सोलो व ग्रुप परफॉर्मन्सची तयारी

नृत्य विभाग

भरतनाट्यम

भरतनाट्यम

तमिळनाडूतील पारंपरिक नृत्यशैली उद्देश:
  • नाट्यशास्त्रानुसार अंगसंचालन, अभिनय, मुद्राभिनय यांचे प्रशिक्षण
  • पारंपरिक प्रस्तुती शैलींची सखोल समज
  • मंचावर आत्मविश्वासाने सादरीकरण
कथक

कथक

उत्तर भारतातील शास्त्रीय नृत्यशैली उद्देश:
  • तत्कार, चक्रदार, तिहाई यांचा सराव
  • कथनात्मक अभिव्यक्ती व कथानक सादरीकरण
  • ताल-लय व नाट्यरसांची एकात्मता
Jyotirgamay

एकत्रित प्रभाव:

  • अनाहत कलानिकेतन विद्यार्थ्यांना केवळ कलाकार घडवण्यावर भर न देता, संस्कारित, संवेदनशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवते.
  • येथील प्रशिक्षणातून विद्यार्थी कलासंवेदनशीलतेचा विकास करतात आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधी बनतात
Whatsapp email call